न्यू श्रीनिवास ज्वेलर्स सादर करीत आहे
NSJ सुवर्ण स्वप्नपूर्ती योजना
छोटे पाऊल, मोठी स्वप्ने
सोन्याचे मालक होण्याचा सोपा आणि किफायतशीर मार्ग!
न्यू श्रीनिवास ज्वेलर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दररोज सोने भाव बुक करण्याचे स्वातंत्र्य.
छोट्या छोट्या गुंतवणूकीतून तुमची मोठी स्वप्ने पूर्ण करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग.
1. नोंदणी करा : न्यू श्रीनिवास ज्वेलर्स मध्ये नोंदणी करा आणि योजनेत सामील व्हा.
2. ऑनलाईन पेमेंट प्रोसेस : दररोज ठरलेली रक्कम ऑनलाईन बँकिंगद्वारे आपोआप तुमच्या बँक खात्यातून वजा होईल.
3. दैनिक सोन्याची खरेदी : तुमच्या प्रत्येक दिवशीच्या रकमेचा वापर सध्याच्या बाजारभावानुसार सोन्याच्या बुकिंगसाठी होईल.
4. तुमच्या रोजच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवा : मोबाईल ॲप वापरुन तुमच्या रोजच्या गुंतवणूकीवर लक्ष ठेवा.
5. बुक झालेल्या सोन्यातून दागिने खरेदी करा : योजनेच्या पुर्णत्वानंतर बुक झालेले सोने सुंदर दागिन्यांमध्ये रुपांतरित करा आणि मेकिंग चार्जेसवर विशेष सवलत मिळवा.
दैनिक सोन्याची गुंतवणूक योजना का निवडावी?
लहान गुंतवणूक, मोठा फायदा :
दररोज कमी रक्कम गुंतवा. छोट्या- छोट्या गुंतवणूकीतून मोठी बचत तयार होईल ज्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करणे सोपे होईल.
भाववाढीपासून संरक्षण :
दररोज सोने खरेदी केल्याने बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळतं आणि सरासरी खर्च कमी होतो.
दागिन्यांची हौस :
तुमचं बुक झालेलं सोनं तुमच्या आवडत्या दागिन्यांमध्ये रुपांतरित करता येईल.
विशेष सवलती :
तुमच्या सोन्याचे दागिन्यांमध्ये रुपांतर केल्यावर मेकिंग चार्जेसवर विशेष सवलतीचा लाभ घ्या.
सोपा आणि सोयीस्कर प्रक्रिया :
ऑनलाईन ऑटो-डेबिटमुळे तुमची रोजची गुंतवणूक विनासायास आणि नियमित होते.
1. विशेष प्रसंगांसाठी बचत करा जसे की लग्न, वाढदिवस किंवा सण.
2. भविष्यासाठी योजना आखा शिस्तबद्ध आणि नियमित सोन्याच्या गुंतवणुकीसह.
3. तुमच्या प्रियजनांना भेट द्या सुंदर आणि अमूल्य सोन्याचे दागिने.
न्यू श्रीनिवास ज्वेलर्स का निवडावे?
शुद्धता आणि उत्कृष्टतेसाठी पिढ्यानपिढ्या विश्वासार्ह.
स्वमालकीची जागा – पिंपळगाव बसवंत, दिंडोरी व नाशिक शहरात तब्बल २० हजार फुटांचे भव्य शोरूम्स असणारी एकमेव सुवर्ण पेढी.
सोनेरी विश्वासार्हता – गेली ४० वर्ष आम्ही गुणवत्ता आणि पारदर्शक व्यवहारातून ग्राहकांचा विश्वास कायम ठेवण्यात यशस्वी झालो आहोत.
सर्व दागिन्यांची भरपूर व्हरायटी, विस्तृत डिझाईन्सचा संग्रह – तुमच्या आवडीप्रमाणे दागिन्यांचे अनोखे आणि आकर्षक डिझाईन्स जे प्रत्येक प्रसंगासाठी योग्य आहेत.
उत्तर महाराष्ट्रात न्यू श्रीनिवास फायनान्सच्या विविध ४ शाखा.
२ लाखांपेक्षा अधिक संतुष्ट ग्राहक
१५०० पेक्षा अधिक गावांशी कनेक्टेड
सरकार मान्य व्हॅल्युअर
सर्वाधिक गुगल रेटिंग
खास डिझाईन्सचे गुणवत्तापूर्ण अलंकार
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर – सोने खरेदी आणि सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्यामुळे तुम्हाला सोयीस्कर आणि जलद सेवा मिळते.
नियम व अटी
*एनएसजे सुवर्ण स्वप्नपूर्ती एसआयपी मध्ये 270 दिवस ऑनलाइन पेमेंट द्वारे डेली कलेक्शन होणार आहे व 365 दिवसांच्या आत खरेदी करणे अनिवार्य आहे.
*या योजनेतून दररोज तुमच्या खात्यात बाजारभावानुसार 22 कॅरेट सोने बुक होणार आहे, 24 कॅरेट साठी ही स्कीम नाही कुठलीही रोख रक्कम घेतली किंवा दिली जाणार नाही.
*नॉमिनी किंवा रजिस्टर सभासदाच्या नंबर वर आलेल्या ओटीपी शिवाय स्कीम रीडिंग करता येणार नाही योजनेत बुक झालेले सोने पूर्णत्वानंतर फक्त दागिऱ्यांच्या स्वरूपात घेऊ शकतात.
*एनएसजे सुवर्ण स्वप्नपूर्ती व न्यू श्रीनिवास ज्वेलर्स मधील इतर कोणत्याही योजनेचा एकत्रित लाभ घेता येणार नाही.
*योजनेत जमा होणारे सोने त्या दिवसाच्या बाजारभावानुसार बुक केले जाईल आणि तुमच्या खात्यात जमा राहील.
*योजना पूर्ण झाल्यानंतर दागिने खरेदी करताना जमा असलेल्या सोन्याच्या मजुरीवर 25% सूट देण्यात येईल.
*योजनेच्या पूर्णत्वाआधी दागिने खरेदी अथवा कॅश करावयाचे असल्यास आपल्या अकाउंट मध्ये 1 ग्रॅम सोने जमा असणे बंधनकारक आहे.
*1 ग्रॅम सोने जमा असल्यास आपण दागिने खरेदी करू शकता परंतु मजुरीचा लाभ (25 टक्के सूट) मिळणार नाही.
*1 ग्राम सोने जमा असल्यास व ते कॅश करावयाचे असल्यास पहिल्या हप्त्याची रक्कम कमी करण्यात येईल व जमा सोन्याला त्या दिवसाचा
*कॅश करण्याचा चालू बाजार भाव लागेल व रक्कम आपल्या अकाउंटला जमा केली जाईल.
*योजनेच्या पूर्णत्वावेळी जे सरकारी टॅक्सेस (जीएसटी) व जी मजुरी असेल ती लागू राहील.
*योजना ज्या रकमेने सुरू केली जाईल तीच रक्कम 270 दिवसांसाठी कायम राहील सोन्याच्या दरानुसार प्रत्येक दिवसाला सोन्याचे प्रमाण बदलेल.
*काही तांत्रिक अडचणीमुळे पेमेंट न आल्यास त्या दिवसाचे बुकिंग होणार नाही.
*ही योजना ऑनलाइन बँकिंग ने होणार असल्या कारणाने कोणीही रोख स्वरूपात सेल्स एक्झिक्युटिव्हकडे किंवा स्कीम लावणाऱ्या कडे पेमेंट देऊ नये.
*सदर योजनेत आपण 22 कॅरेट त्याचप्रमाणे 18 कॅरेट व 14 कॅरेटचे दागिने खरेदी करू शकता बुकिंग मात्र 22 कॅरेट सोन्याचे होईल.